Sunday, August 23, 2026
Google search engine

       मूल शहर डासांच्या विळख्यात!*
कचरा, तण अन् अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न:- शिवसेनेच्या नगर परिषदेला निवेदन

✍️देव पिंपळे मूल प्रतिनिधी ✍️.                 : पावसाळा सुरू असतानाच मूल शहरातील विविध भागांमध्ये कचरा, तण, झाडे-झुडपे तसेच नाल्यांमध्ये साचलेल्या घाणीचे प्रमाण वाढले आहे. परिणामी डास व माशांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून ही , नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या गंभीर समस्येकडे नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने शहर प्रमुख विशाल नागुलवार यांच्या मार्फत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी, नगर परिषद मूल यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनातून शहरातील विविध प्रभागांमध्ये कचऱ्यावर तणनाशक फवारणी, नाल्यांमध्ये डास नियंत्रणासाठी औषध फवारणी तसेच स्वच्छतेची प्रभावी मोहीम तातडीने राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
पावसाळ्यात डासांची उत्पत्ती वाढल्यास नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर होण्याची वाट न पाहता नगर परिषद प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केली आहे.
“नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून त्वरित फवारणी व स्वच्छता मोहीम सुरू करावी,” अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदन देताना शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख स्वप्निलभाऊ अक्केवार, शहर सचिव संजय खैरे राजेश राव क्षीरसागर, शुभम भाऊ समर्थ , सुरज भाऊ आत्राम, अरविंद भाऊ नामेवार व शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते….

Previous article
Next article
RELATED ARTICLES

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments