सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल येथे व्यसनमुक्ती कार्यक्रम संपन्न
✍️देव पिंपळे मुल प्रतिनिधी ✍️ प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मूलच्या वतीने आज दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोज मंगळवार ला सुभाष उच्च प्राथमिक शाळा मुल येथे नशा मुक्ती प्रतिज्ञा महाभियानांतर्गत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांमध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मूलच्या आदरणीय दिपा दीदी यांनी, विद्यार्थ्यांना व्यसन म्हणजे काय, त्याचे वाईट परिणाम आणि त्यापासून सुटका या संबंधात अतिशय महत्त्वाचे मार्गदर्शन केले. मोबाईलच्या व्यसनापासून ते दारू, गुटखा, तंबाखू आणि इतर अमली पदार्थ याबाबत उदाहरणा सहित विद्यार्थ्यांना अतिशय सहज व सोप्या भाषेमध्ये व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगितले. मनाची एकाग्रता वाढवून अभ्यासामध्ये पूर्ण लक्ष घालून आपण आपले जीवन यशस्वी कसे करायचे हे प्रात्यक्षिका सह समजावून सांगितले. याप्रसंगी उपस्थित श्री सुरेश रायकंटीवार साधक यांनी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांना नशा विरोधी प्रतिज्ञा दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री अविनाश जगताप यांनी केले तर संचालन सहाय्यक शिक्षक बंडू अल्लीवार यांनी केले, आभार श्री राहुल मुंगमोडे यांनी मानले. याप्रसंगी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मुलच्या सौ निर्मलाताई लोणारे, शाळेचे पदवीधर शिक्षक श्री राजू गेडाम श्री योगेश पुल्लकवार, कु. रीना मसराम, सौ. संध्या आभारे, श्री संकेत जाधव उपस्थित होते.