श्री साई मित्र परिवारातर्फे सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा: वृद्धाश्रमात ७५ वृद्धांना भोजनदान व ब्लँकेट वाटप
Oplus_131072
मूल प्रतिनिधि:-
श्री साई मित्र परिवारचे सदस्य श्री. बंडू भास्कर साखलवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक भान जपत वृद्धाश्रमात एक स्तुत्य व आदर्श उपक्रम राबवण्यात आला. या प्रसंगी वृद्धाश्रमातील ७५ वयोवृद्ध आजी-आजोबांना अन्नदान (भोजन) तसेच थंडीपासून संरक्षणासाठी ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
आपल्या वाढदिवसाचा खर्च अनावश्यक चकचकाटावर न करता समाजातील दुर्लक्षित व गरजू घटकांच्या सेवेसाठी खर्च करून साखलवार दांपत्याने एक नवा आदर्श घालून दिला आहे. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. त्यांनी बंडू साखलवार यांना दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक आशीर्वाद दिले.
याप्रसंगी वाढदिवस मूर्ती श्री. बंडू भास्कर साखलवार, त्यांच्या धर्मपत्नी, नगरसेवक श्री. विवेक मुत्यलवार, श्री. संदीप आलेवार, श्री. शैलैश देशट्टीवार, श्री. नितीन अलगुनवार यांच्यासह श्री साई मित्र परिवाराचे इतर सदस्य आणि स्नेही उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला हे विषेष