Wednesday, April 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedमूल येथील अवनी सुहास पूप्पलवार हिचे सीबीएसई दहावी परीक्षेत दैदीप्यमान यश; ९७.६०%...

मूल येथील अवनी सुहास पूप्पलवार हिचे सीबीएसई दहावी परीक्षेत दैदीप्यमान यश; ९७.६०% गुण मिळवून पटकावला प्रथम क्रमांक


🖋️देव पिंपळे मुल प्रतिनिधी 🖋️
नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) दहावीच्या निकालात मूल येथील अवनी सुहास पूप्पलवार हिने घवघवीत यश संपादन केले आहे. अवनीने ९७.६०% गुण मिळवून तालुक्यातून आणि समाजातला गौरव वाढवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
बेलदार समाजातील या कन्येने मिळवलेल्या या यशाबद्दल संपूर्ण परिसरातून तिचे कौतुक होत आहे. अत्यंत चिकाटीने आणि नियोजित अभ्यासाच्या जोरावर तिने हे यश संपादन केले असून, तिच्या या कामगिरीमुळे पूप्पलवार परिवारासह बेलदार समाजात आनंदाचे वातावरण आहे.
यशाचे गमक:
अवनीने आपल्या यशाचे श्रेय तिचे आई-वडील, शिक्षक आणि मार्गदर्शकांना दिले आहे. परीक्षेत मिळालेले हे गुण केवळ कठोर परिश्रमाचे फळ असल्याचे तिने नमूद केले. भविष्यात उच्च शिक्षण घेऊन समाजाची सेवा करण्याचा मानस तिने व्यक्त केला आहे.
तिच्या या यशाबद्दल शहरातील विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांनी तिचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. एका सामान्य कुटुंबातील मुलीने घेतलेली ही उत्तुंग भरारी ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments