
✍️ गडचिरोली प्रतिनिधी ✍️. सहकार क्षेत्रात राज्य व देशपातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटविला गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी उच्चशिक्षित ईशा प्रचिती पोरेड्डीवार यांची बिनविरोध निवड झाली आहे, या निवडणुकीत त्या बॅकेच्या गडचिरोली जिल्ह्यात इतिहासात प्रथमच महिला अध्यक्ष म्हणून ठरला आहे, उपाध्यक्षपदी क्षिरसागर नाकाडे तर मानद सचिवपदी दीपक निंबेकर यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली,. बॅकेच्या सभागृहात १५ एप्रिल रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष,व मानद सचिव पदासाठी निवड करण्यात आली, या सभेत बकेत सर्व संचालक उपस्थित होते, अध्यक्षपदी ईशा पोरेड्डीवार, उपाध्यक्षपदी क्षिरसागर नाकाडे, तर मानद सचिव पदासाठी दीपक निंबेकर यांचीही एकच अर्ज दाखल झाल्यानंतर तिन्ही पदासाठी निवड बिनविरोध निवडून आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश चंदेल जाहीर केले,. सहकार क्षेत्रात जेष्ठ नेते सहकार महर्षि अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी योग्य नियोजन आणि दिर्घकाळ अनुभवांच्या बळावर बॅकेचे २१ संचालक अविरोध निवडून आपले वर्चस्व कायम ठेवले आहे, नवनिर्वाचित अध्यक्ष ईशा पोरेड्डीवार या सहकार महर्षि अरविंद सावकार पोरेड्डीवार यांचा सुन असुन बॅकेचे माजी अध्यक्ष प्रंचीत सावकार पोरेड्डीवार यांचा पत्नी आहेत, ह्या निवड सभेला सहकार महर्षि अरविंद सावकार पोरेड्डीवार,नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार, माजी अध्यक्ष प्रंचीत सावकार पोरेड्डीवार, श्रीहरी भंडारी वार ,अनंत साळवे, डॉ दुर्वश भोयर तसेच बॅकेच्या नवनियुक्त संचालक छाया पोरेड्डीवार, निलिमा पोरेड्डीवार, यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते, सभेत संचालन बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी केले, यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकांचे माजी संचालक आणि मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले




