महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नवेगाव रयतवारी येथे गुणवंतांचा गौरव

तालुका प्रतिनिधी चामोर्शी :- उमेश गझलपेल्लीवार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून, शिवशाही ग्रामविकास संघटना नवेगाव रयतवारी यांच्या वतीने स्थानिक जिल्हा परिषद शाळेत एका विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातील आणि शाळेतील विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल आकाश विलास भोवरे, अनिकेत रवींद्र गव्हारे आणि गुरुदेव साईनाथ खोडवे या तरुणांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आशिष येलेवार यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल आणि तन्मय प्रवीण कोसरे या विद्यार्थ्याची नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवानी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांत मुनगेलवार होते. त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांसमोर यशाचा आदर्श ठेवत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या मंत्राचे महत्त्व अधोरेखित केले. तर
प्रमुख अतिथी म्हणून रामचंद्र सातपुते, सुनील दुधबळे, कोठारे मुख्याध्यापक जि.प.शाळा नवेगाव रै, गुरूदास गेडाम, वासुदेव बारसागडे, ज्ञानेश्वर देवगिरीकर, ज्ञानेश्वर कणगणतुलवार, शिवाजी भांडेकर, श्रीकांत भांडेकर,रूपेश सातपुते, पंकज शेंडे, चेतन कोठारे, रूतुकेश भांडेकर, रूत्विक नैताम, अमित भांडेकर, प्रविण कोसरे,उडाण सर, मेश्राम मैडम,गोंगले मैडम, मुळे मैडम दडवे सर उराडे सर कापगते सरकार्यक्रमाचे संचालन कु.सुनिता लांभाडे मैडम तर आभार प्रदर्शन मेश्राम मैडम यांनी केले

शिवशाही ग्रामविकास संघटनेच्या या उपक्रमाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दाद दिली. कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सत्कारार्थींनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षक, पालक आणि मार्गदर्शकांना दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवशाही ग्रामविकास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.




