
तालुका प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. शहरातील नागरिकांना सध्या गॅस सिलेंडर मिळविण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, सावली येथून पुरवठा होत असला तरी तो अपुरा ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या वेळी शहर प्रमुख बादल करपे तसेच पदाधिकारी आकाश कावळे, राकेश मोहुर्ले, चेतन घोनमोडे आणि स्वप्नील नागोशे उपस्थित होते.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, गॅस एजन्सी बंद असल्यामुळे नागरिकांना वेळेत सिलेंडर मिळत नाही, तसेच अनेकांना रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत असून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
सदर परिस्थिती लक्षात घेता, मूल शहरातील HP गॅस एजन्सी तात्काळ पूर्ववत सुरू करून नियमित पुरवठा सुनिश्चित करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे




