
🖋️देव पिंपळे मूल प्रतिनिधी 🖋️. नुकताच दहावीचा सि बी एस इ बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनि कुठेही मागे न राहता दैदीप्यमान यश संपादन केले आहे,कुमारी.अवनी सुहास पुपलवार ही विद्यार्थीनिने मुल तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत 97.60 टक्के गुण संपादन केले, आज भारतीय जनता पक्षातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि पेढे भरवत अभिष्टचिंतन करण्यात आले, सदर शिष्टमंडळात भाजप मुल तालुका अध्यक्ष चंदू मारगोनवार, शहर अध्यक्ष प्रवीण मोहूर्ले, भाजप नेत्या सौ किरण कापगते, माजी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, नगरसेविका सौ प्राची आक्केवार, सौ अश्विनी निकोडे, महासचिव जितू टिनगुसले, राकेश ठाकरे, युवराज चावरे , आनंद आक्केवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते, प्रसंगी नगरसेविका प्राची आक्केवार यांनी संविधान बोर्ड देत गुणवंतांचा सत्कार केला




