*सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल येथे लेखन प्रेरणा दिन व विविध समित्यांची सभा संपन्न.* ✍️देव पिंपळे मुल प्रतिनिधी ✍️
आज दिनांक 1ऑगस्ट 2026 रोज शनिवारला सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल येथे, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती तसेच सखी सावित्री समिती व महिला तक्रार निवारण समितीची बैठक शाळेचे अध्यक्ष श्री नरसिंग गणवेनवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेला मूल नगरपरिषदेच्या अध्यक्षा आदरणीय सौ एकता ताई समर्थ हे प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शाळेने केलेली उपाययोजना, शासनाच्या निकषाप्रमाणे करावयाची उपायोजना, दैनंदिन शैक्षणिक कार्यात पालकांचा सहभाग वाढविणे, विद्यार्थ्यींनीन करिता समुपदेशन वर्ग आयोजित करणे,व इतरही मुद्दे चर्चेला येऊन त्यावर साधक बाधक चर्चा करून सभा संपन्न झाली.
या सभेला मुल नगर परिषदेचे बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, नगरसेविका सौ अश्विनीताई निकोडे, नगरसेवक श्री नितीन भाऊ गद्देवार एडवोकेट अनंत बल्लेवार सर, मारोडा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री पेंदोर सर , पोलिस प्रतिनिधी पुजा मेश्राम,गणेश मांडवकर ,सुवर्णाताई पिपरे, इंदुताई मडावी ,मनीष येलट्टीवार ,निलेश बंडावार ,माधुरी चिंचोलकर, प्रतिमा नखाते ,श्रीमती शुभांगी चावके, शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप ,पदवीधर शिक्षक राजु गेडाम,समिती सचिव कु. रिना मसराम , सहा . शिक्षक राहुल मुंडे योगेश पुलकवार, बंडु अल्लीवार, अजय राऊत , सौ .निशा जगताप सह सर्व शिक्षक वृंद व सर्व समितीचे सन्माननीय पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
या निमीत्ताने विद्यार्थ्यांचा लेखन व वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सुवाच्य अक्षर काढणाऱ्या विद्यार्थ्यांना अँड. अनंत बल्लेवार सर आणि मारोडा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री तानाजी पेन्दोर यांनी बक्षीस जाहीर केले.