Saturday, August 22, 2026
Google search engine

विश्वशांती विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती चा कार्यक्रम संपन्न
✍️देव पिंपळे मुल प्रतिनिधी ✍️.                                                                 विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, मारोडा येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री धनंजय गाडेवार  यांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान, समाजजागृतीसाठी केलेले कार्य तसेच “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” या त्यांच्या घोषणेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषणे सादर करून लोकमान्य टिळक तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याबद्दल आदर व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करून देशसेवा आणि समाजसेवा करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाच्ये आयोजन  मुख्याध्यापक श्री धनंजय गाडेवार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोशन थोरात सर तसेच संचालन प्रियंका मिसार मॅडम ,तर आभार प्रदर्शन शलाका हांडेकर मॅडम यांनी केले

Previous article
Next article
RELATED ARTICLES

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments