नवभारत विद्यालय मुल येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

शिक्षण प्रसारक मंडळ, मूलद्वारा संचालित नवभारत विद्यालय, मुल येथे दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. वर्षा भांडारकर मॅडम या होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक श्री. गुरुदास चौधरी सर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी लोकमान्य टिळक यांचे राष्ट्रप्रेम, शिक्षणाविषयीचे विचार आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदान तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, समाजजागृती आणि सामाजिक समतेसाठी केलेले कार्य याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार सांगितले.
कार्यक्रमास शिक्षक कु प्रतिमा उमक मॅडम , विकास मोडक सर, राजू बोढे सर, विजय निखारे सर, उदयचंद चौधरी सर, माधुरी तलांडे मॅडम, दिपा गोंगल मॅडम, भारत सलाम सर ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश माथनकर सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षकांनी केले.




