
मूल तालुका प्रतिनिधी. मूल तालुका मध्ये उन्हाळा सूरूवातीलाच येरगाव येथे पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून तसेच आतापासूनच ग्रामीण भागात महिलांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने अखिलभाऊ गांगरेडीवार माजी सरपंच भेजगाव यांच्या नेतृत्वाखालील मा. शिंदे बिडीओ प. स. मूल व उपविभागीय पाणीपुरवठा अधिकारी एन. गंदलवार यांना निवेदन देण्यात आले तसेच आठ ,दहा दिवसांत पानाची समस्या सोडवली जाईल अशी ग्वाही दिली.

यावेळी निवेदन देताना महादेवभाऊ नागापुरे माजी सरपंच येरगाव ,राजभाऊ नागापुरे माझी सदस्य ग्रामपंचायत येरगाव , किशोर ठेंगणे ग्रामसेवक ,उमेश भाऊ फुलझले ,आयुष नागापुरे ,उपस्थित होते…





