Saturday, August 22, 2026
Google search engine

शाळांना नियमित व दर्जेदार, शालेय पोषण आहार मिळावा – आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवेदन

 

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी पोषण आहार नियमित करा – मूल येथील भाजप कार्यकर्त्यांची आमदारांकडे मागणी

मुल प्रतिनिधि:-
शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत मिळणारा मोफत शालेय पोषण आहार नियमित, पौष्टिक व नियमित स्वरूपात उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी
मूल येथील भाजप कार्यकर्त्यांची आमदारांकडे माननीय आमदार  सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवेदन सादर केले.

विद्यार्थ्यांचे आरोग्य, शारीरिक विकास आणि शैक्षणिक प्रगती यामध्ये शालेय पोषण आहाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शाळेत मिळणारा पोषण आहार हा त्यांच्या दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना नियमित व संतुलित आहार उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे.

मात्र सध्या काही शाळांमध्ये पोषण आहाराच्या नियमित वितरणाबाबत आणि अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी पालक, विद्यार्थी व नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत. पौष्टिक व नियमित आहाराचे वितरण व्हावे व आहारात फळे,अंडी, पालेभाज्या यांचा नियमित समावेश करावा याकडे संबंधित यंत्रणांनी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार ही केवळ शासकीय योजना नसून ती त्यांच्या आरोग्याशी निगडित महत्त्वाची जबाबदारी आहे. आहार तयार करण्याची प्रक्रिया, वापरण्यात येणाऱ्या साहित्याची गुणवत्ता आणि स्वच्छता याबाबत कठोर निरीक्षण असणे आवश्यक आहे.

या संदर्भात माननीय आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून संबंधित विभागाला तात्काळ आवश्यक सूचना द्याव्यात. तसेच शाळांमध्ये दर्जेदार व नियमित पोषण आहार मिळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदन देताना सांगण्यात आले की, विद्यार्थ्यांचे आरोग्य सक्षम राहिले तरच त्यांची शैक्षणिक वाटचाल भक्कम होईल. त्यामुळे शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे ही काळाची गरज आहे,आमदार
सुधीर मुनगंटीवार यांनी सदर विषय दोन दिवसात निकाली काढण्याचे आश्वासन दिले,
निवेदन देताना ब्रिजभूषण पाझारे जिल्हा महामंत्री भाजपा. मिलिंदजी खोब्रागडे. अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष भाजपा. संदीप मोहबे शहर उपाध्यक्ष. जितू टिंगूसले महामंत्री मूल शहर भाजप
सुनील कुकुडकार, सांस्कृतिक अध्यक्ष मुल भाजपा,
संतोष गाजूलवार शक्ती केंद्र प्रमुख
आनंद आकेवार भाजपा कार्यकर्ता.
सचिन बोर्डावार भाजप कार्यकर्ता मूल आदींची उपस्थिती होती.

Previous article
Next article
RELATED ARTICLES

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments