गुरु पौर्णिमा निमित्य गुरुदेव सेवा मंडळ मूल चा उपक्रम एक घर, एक उपासक, एक दिवस, एक अध्याय वाचन
✍️देव पिंपळे मूल प्रतिनिधी ✍️
मूल येथील गुरुदेव सेवा उपासक व श्रीगुरुदेव सेवा बचत गट च्या वतीने गुरु पौर्णिमा निमित्त मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे साहित्य विचार व ग्रामगीता प्रबोधन व्हावे या दृष्टीने एक घर एक उपासक एक दिवस एक अध्याय वाचन चा कार्यक्रम सुरुवात करण्यात आला या कार्यक्रमा अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचार समर्पित मंडळीकडे सामुदायिक प्रार्थना आणि ग्रामगीतेतील 41 अध्याय वाचन उपक्रम आयोजन करण्यात आले एक घर एक उपासक एक दिवस एक अध्याय अशा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात आषाढ शुद्ध गुरुपौर्णिमा दिनांक 29 जुलै 2026 पासून श्री रमेश तांगडे आणि सुलोचना तांगडे यांच्या निवासस्थानी ग्रामगीतेतील सद्धर्म मंथन पंचकातील प्रथम अध्याय देवदर्शन या वाचनाने सदर उपक्रमात 41 दिवस 41 अध्याय वाचन अखंड चालणार असून या कार्यक्रमाची सांगता श्रावण मास समाप्तीने होईल