Saturday, August 22, 2026
Google search engine

मूल तालुक्यातील निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरण रस्ते कामांची चौकशी करून दोषींवर कारवाईची भाजपची मागणी                          

✍️देव पिंपळे मूल प्रतिनिधी ✍️:                               मूल तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या विविध रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामांमध्ये गंभीर अनियमितता व निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष प्रवीण मोहुर्ले यांनी उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, मूल यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अनेक ठिकाणी नव्याने करण्यात आलेले डांबरीकरण अल्पावधीतच उखडू लागले असून रस्त्यांची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे. तसेच नाल्यांमधील माती रस्त्यावर टाकल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झुडपे व तण वाढले असून त्यांची साफसफाई करण्यात आलेली नाही. याशिवाय रस्त्यालगत करण्यात आलेल्या वृक्षारोपणाची योग्य देखभाल होत नसल्यामुळे अनेक झाडांची दुरवस्था झाली आहे.
या सर्व बाबींची तात्काळ सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच निकृष्ट दर्जाचे रस्ते त्वरित दुरुस्त करावेत, रस्त्यालगतची झुडपे व तण हटवून स्वच्छता करावी आणि वृक्षांची नियमित देखभाल करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी प्रवीण मोहुर्ले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Previous article
Next article
RELATED ARTICLES

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments