कोळसा खान प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने साखळी उपोषण 
✍️सतीश राजुरवार संपादक✍️ कोळसा खान प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने नागपूर येथील वेकोलि (WCL) कार्यालयासमोर मौजे उकणी खंड-1 मधील उर्वरित 15 टक्के जमीन तातडीने संपादित करून गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते.
आज सेफ्टी बोर्ड सदस्य म्हणून उपोषणस्थळी भेट देऊन प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांशी संवाद साधला व त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला.
यानंतर माननीय शिवकुमार यादव (अध्यक्ष, HMS युनियन), सचिव शरद धांडे, संघर्ष समितीचे पदाधिकारी तसेच वेकोलिचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत सविस्तर बैठक पार पडली. बैठकीस डायरेक्टर (टेक्निकल), डायरेक्टर (फायनान्स), जीएम (लँड अँड रेव्हेन्यू), जीएम (आयआर) तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
माननीय सीएमडी हेमंत पांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली समिती गठित करून येत्या 15 दिवसांत अहवाल सादर करण्यात येईल व जमीन संपादनाबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे ठोस आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. या आश्वासनानंतर संघर्ष समितीने उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
या प्रसंगी माननीय शिवकुमार यादव, शरद धांडे, बबन उरकुडे, जीएम (आयआर), जीएम (लँड अँड रेव्हेन्यू) तसेच संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री. सुरेश ढपकस, कार्याध्यक्ष श्री. अमोल पूरडकर, उपाध्यक्ष श्री. पराग तुरानकर, सचिव श्री. श्यामसुंदर जुनारकर, सहसचिव श्री. सचिन लोडे, कोषाध्यक्ष श्री. मनोज खाडे, सदस्य श्री. संजय बांदुरकर, श्री. चंद्रकांत जीवतोडे, श्री. पद्माकर झाडे, श्री. महेश पाटील, श्री. विकास लालसरे, श्री. संतोष धांडे, श्री. किसन परशिवे, सौ. उषा ठाकरे, सौ. गिता पिगे, ऍड. श्री. विवेक तिवारी, श्री. सचिन क्षीरसागर यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने उपस्थित शेतकरी बांधव उपस्थित होते.




