Wednesday, April 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedवनक्षेत्रात ‘वनवणवा’ पेटवणाऱ्या विरुद्ध कुनघाडा (रै.) वनविभागाची धडक कारवाई

वनक्षेत्रात ‘वनवणवा’ पेटवणाऱ्या विरुद्ध कुनघाडा (रै.) वनविभागाची धडक कारवाई



**जंगलात आग लावणाऱ्याला रंगेहात अटक**. 🖋️सतिश राजुरवार संपादक 🖋️

उन्हाळ्याच्या दिवसांत वनसंपदेचे रक्षण करण्यासाठी वनविभाग सतर्क असतानाच, जंगलात आग लावणाऱ्या एका इसमाला कुनघाडा वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. गणपूर नियतक्षेत्रातील राखीव वनात आग लावल्याप्रकरणी भानुदास सोनूजी बुरले (रा. काशिपूर) याला अटक करून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

​दिनांक २९ मार्च २०२६ रोजी नवेगाव नियतक्षेत्राचे वनरक्षक व अग्निरक्षक गस्तीवर असताना, त्यांना कक्ष क्र. ११७ मधील राखीव वनक्षेत्रात एक व्यक्ती पालापाचोळा जमा करून आग लावताना आढळली. घटनेचे गांभीर्य ओळखून वनपरिक्षेत्र अधिकारी कु. मधूमती तावाडे, क्षेत्रसहाय्यक एच. जी. झोडगे आणि वनरक्षक कु. एच. एम. मडामे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
​वनातील आगीचे रौद्ररूप पाहून पथकाने ब्लोअर मशिन आणि झाडांच्या फांद्यांच्या साहाय्याने अथक परिश्रम करून आग विझवली. त्यानंतर आरोपी भानुदास बुरले याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने मोहाची फुले वेचण्यासाठी झाडाखालची जागा साफ करण्याच्या उद्देशाने आग लावल्याची कबुली दिली.

​वनविभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार, या आगीत सुमारे १.९८ हेक्टर वनक्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये जमिनीवरील पालापाचोळा, लहान झाडे आणि उपयुक्त कीटक जळून खाक झाले आहेत. वनविभागाने घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेली सायकल, आगपेटी आणि सुमारे ५ किलो मोहाफुले जप्त केली आहेत.

​आरोपीविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २६(१) ब, ड आणि कलम ५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० मार्च रोजी आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला गडचिरोली येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर करण्यात आले.

“जंगलाला आग लावणे हा गंभीर गुन्हा आहे. यामुळे केवळ झाडेच नव्हे तर जैवविविधतेचेही अतोनात नुकसान होते. नागरिकांनी मोहाची फुले वेचण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणाने जंगलात आग लावू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल.”
— वनविभाग, कुनघाडा यांच्या पथकाने व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी

ही कारवाई उपवनसंरक्षक (गडचिरोली) आर्या मॅडम, आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात क्षेत्रसहाय्यक एच. जी. झोडगे, वनरक्षक एन. व्हि. वाडगुरे, कु. एच. एम. मडामे, ए. एम. टेकाम, वनमजूर अमिष खोब्रागडे आणि चालक मुकेश हजारे यांचा समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments