Saturday, August 22, 2026
Google search engine

सौंदर्यकरण हवेच,सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा….
— अ.भा.समता परिषदेची भावनिक मागणी.

✍️देव पिंपळे मूल प्रतिनिधी ✍️:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या विकास निधीतून 25 लक्ष रुपये निधी मंजूर झालेला आहे.
परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी उपलब्ध असताना सुद्धा प्रत्यक्षात 9 महिने
लोटून ही न.प.ने हिरवी झेंडी न दाखविल्याने कामाला सुरुवात झालेली नाही.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी या देशांमध्ये समतेची व शिक्षणाची बीजे पेरली,समस्त मानव जातीला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे त्यांचे महान कार्य सर्वश्रुत आहे.
देशामध्ये स्वातंत्र्य,समता,न्याय,बंधुता या तत्त्वावर महात्मा ज्योतिबा फुले यांनी जी सामाजिक क्रांती केली,त्यातून पुढे चालून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून समस्त भारतवासीयांना समान न्याय हक्क मिळवून दिले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना गुरुस्थानी मानले अशा महान समाजसुधारकाच्या स्मृती तेवत राहाव्यात व स्त्री स्त्रीमुक्तीचा व शिक्षणाचा संदेश हा सर्वांना प्रेरणादायी ठरावा याकरिता शहरातील प्रस्तावित असलेल्या क्रांतीसुर्य महात्मा फुले चौकाच्या सौंदर्यीकरणासोबत महात्मा फुले व सावित्री फुले या दाम्पत्यांचे स्मारक उभारण्यात यावे,अन्यथा जन आंदोलन उभारण्यात येईल अशी भूमिका समता परिषदेने मांडली.
अ.भा.समता परिषद जिल्हा अध्यक्ष प्रा.विजय लोंबते यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने ओ.बि.सी.समाज बांधवांनी न.प.प्रशासनास निवेदन सादर करून आपल्या भावना व्यक्त केल्यात.
जवळपास 30 ते 35 हजार लोक वस्तीचे हे शहर असतानाही जनभावनेचा विचार करून तात्काळ नगर प्रशासनाने निर्णय घ्यावा अशी भूमिका जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले यांनी मांडली.चर्चा सकारात्मक झाली,आश्वासन मिळाले.
याप्रसंगी समता परिषदेचे सल्लागार माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. रामभाऊ महाडोळे,जिल्हा महासचिव प्रा.गंगाधर कुंनघाडकर,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख युवराज चावरे,सामाजिक कार्यकर्ते किरणभाऊ गावतुरे,माजी नगराध्यक्षा सौ.उषाताई शेंडे,माजी उपाध्यक्ष चंदू भाऊ चटारे,नगरसेवक बंडू गुरनुले,तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष गुरू गुरनूले,नगरसेवक तुकाराम गुरुनुले,नगरसेविका अश्विनी रुपेश निकोडे,युवा नेते राकेश ठाकरे,नितीन गुरनुले सरपंच फीस्कुटी,सुरज मांदाळे,समता परिषदेचे शहराध्यक्ष राकेश मोहूरले,रुपेश निकोडे,प्रशांत भरतकर,जिल्हा संघटिका सौ.सीमाताई लोणबले,सौ.अर्चना चावरे,सौ.अर्चना मोहूरले,प्रा. डॉ.केवल कराडे,किरण खोब्रागडे,देवराव ढवस,प्रा.धनंजय चुधरी,राऊत,नितेश मकलवार,सतीश राजुरवार,मनोहर शेंडे,प्रेषित निकोडे,शिव शेंडे,यांचेसह समता परिषदेचे कार्यकर्ते व ओ.बि.सी.बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
➡️ स्मारकासोबतच सौदर्यीकरण होईल:- नगराध्यक्षा ऐकता समर्थ……
अ.भा.समता परिषदेचे शिष्टमंडळाने लवकरात लवकर फूले चौकाचे सौदर्यीकरण व
फुले दांम्पत्यांचे स्मारक उभारण्यात यावे याकरीता न.प.प्रशासनास निवेदन देत बहुजनांच्या भावना ताकदीने पुढे ठेवल्यात.
सौदर्यीकरणा करीता
25 लक्ष रूपये उपलब्ध झाले
आहेत.सोबतच फूले दांम्पत्यांचे स्मारक उभारण्यात येईल असे
आश्वासन यावेळी न.प.अध्यक्षा
सौ.ऐकता समर्थ यांनी दिले.
येत्या 7 आगस्ट ला होणाऱ्या सभेत सदर ठराव मंजूर करून त्वरीत कामाला सुरुवात करण्याची ग्वाही त्यांनी दिली.यावेळी न.प.मुख्याधिकारी संदिप दोडे,बांधकाम सभापती
प्रशांत समर्थ उपस्थित होते.

Previous article
Next article
RELATED ARTICLES

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments