Saturday, August 22, 2026
Google search engine

मा. आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतील छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुल तात्काळ सुरू करावे – प्रवीण मोहुर्ले
✍️देव पिंपळे मुल प्रतिनिधी ✍️                                मूल शहरातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने मा. आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून सुमारे ₹१३ कोटींचा निधी मंजूर करून “छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुल” उभारण्यात आले आहे. या व्यापार संकुलामुळे स्थानिक युवक, उद्योजक व लघु व्यावसायिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
मात्र, व्यापार संकुलाची इमारत पूर्णत्वास जाऊनही अद्याप गाळ्यांचे वितरण झाले नसल्याने संपूर्ण प्रकल्प वापराविना पडून आहे. त्यामुळे व्यवसाय करू इच्छिणाऱ्या अनेक युवकांना प्रतीक्षा करावी लागत असून शहराच्या आर्थिक विकासालाही विलंब होत आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, मूल शहराध्यक्ष श्री. प्रवीण मोहुर्ले यांनी नगर परिषद, मूल यांच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून व्यापार संकुलातील गाळ्यांचे वितरण पारदर्शक पद्धतीने तात्काळ पूर्ण करावे व व्यापार संकुल सर्वसामान्यांसाठी सुरू करावे, अशी मागणी केली आहे.
यावेळी श्री. प्रवीण मोहुर्ले यांनी सांगितले की, मा. आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी युवकांच्या रोजगाराचा विचार करून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर केला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा लाभ लवकरात लवकर युवक, व्यापारी व नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. व्यापार संकुल सुरू झाल्यास स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती होईल, नवीन व्यवसायांना चालना मिळेल आणि मूल शहराच्या आर्थिक विकासाला गती मिळेल.
नगर परिषद प्रशासनाने गाळे वाटपाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुल सर्वसामान्य नागरिकांसाठी कार्यान्वित करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
निवेदन देताना उपस्थित होते :
श्री. प्रवीण मोहुर्ले (शहराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, मूल), सौ. प्राची आक्केवार (नगरसेविका), सौ. अश्विनी निकोडे (नगरसेविका), श्री. जितू टिंगूसले (महामंत्री), श्री. सुधीरजी नागोसे आणि श्री. संतोष गाजुलवार.
– प्रसिद्धीसाठी
प्रवीण मोहुर्ले
शहराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, मूल

Previous article
Next article
RELATED ARTICLES

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments