Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिरोंचा तालुक्यातील टेकडा (टेकडा ताला) येथे बस सेवा सुरू

सिरोंचा तालुक्यातील टेकडा (टेकडा ताला) येथे बस सेवा सुरू

**भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पाठपुराव्याला यश**. गडचिरोली प्रतिनिधी:-

सिरोंचा तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या टेकडा (टेकडा ताला) येथे अखेर एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली असून, प्रत्यक्ष बस गावात दाखल झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

ही बस सेवा सुरू होण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. या उपक्रमामागे सचिन मोतकूलवार (भाकप, गडचिरोली जिल्हा सचिव) यांच्या मार्गदर्शनाखाली रवि बारसागंडी (सिरोंचा तालुका सचिव) यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

टेकडा परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व कामगारांना दळणवळणाच्या सुविधांचा अभाव असल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. शाळा, महाविद्यालय, दवाखाना, तहसील व बाजारपेठेत जाण्यासाठी खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते. या गंभीर समस्येची दखल घेत रवि बारसागंडी यांनी वारंवार निवेदने देत बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती.

अखेर एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक निर्णय घेत टेकडा येथे नियमित बस सेवा सुरू केली. यामध्ये एस.टी. महामंडळाचे अधिकारी
चंद्रभूषण घागरगुंडे (आगार व्यवस्थापक ),
जितेंद्र चंपालाल राज वैद्य (बस स्थानक प्रमुख), सूर्यकांत भगवान मोरे (वाहतूक नियंत्रण),
धुरबेश मेश्राम (वाहतूक नियंत्रण, सिरोंचा) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

बस गावात दाखल होताच ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत स्वागत केले. या निर्णयामुळे शिक्षण, आरोग्य व रोजगारासाठी ये-जा करणे आता अधिक सोपे होणार आहे.
बस सेवा सुरू झाल्याबद्दल ग्रामस्थांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच विशेषतः रवि बारसागंडी, सचिन मोतकूलवार, यावेडी आंनदराव अशा आणि सतीश आरे यांचे आभार मानले असून, ही सेवा कायमस्वरूपी व नियमित ठेवण्याची मागणीही केली आहे.

RELATED ARTICLES

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments