Wednesday, April 22, 2026
Google search engine
Homeचंद्रपूरचंद्रपूर जिल्ह्यातील इको क्लब शाळांमधून नवभारत विद्यालय मूल ची निवड.

चंद्रपूर जिल्ह्यातील इको क्लब शाळांमधून नवभारत विद्यालय मूल ची निवड.

चंद्रपूर:—–
राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत जिल्ह्यातील इको क्लब शाळांमधून उपवनसंरक्षक सामाजिक वनीकरण नागपूर विभागाने चंद्रपूर जिल्ह्यातून नवभारत विद्यालय मूल या शाळेची निवड केली आहे.
नवभारत विद्यालय मूल येथे हरित सेना स्थापन करण्यात आली आहे. हरित सेना उपक्रमाअंतर्गत शाळा
पयॅवेक्षीका सौ.व्ही.एस.भांडारकर यांनी विद्यार्थांना पर्यावरण संवर्धनाचे धडे देऊन विविध उपक्रम राबविले आहेत हे विशेष. शाळा परिसरात विविध फळांच्या, फुलांच्या, फळभाजी च्या बीया जमा करुन सीडबॅंक तयार करण्यात आली असून त्या बीया गरजुंपर्यंत जाऊन वाटप करण्यात आल्यात. सौ. भांडारकर यांनी
पर्यावरण कार्यशाळा भरवून सीडबाॅल कसे तयार करायचे हे आपल्या कृतीतून करुन दाखवले आहे.
घरोघरी शौषखड्डे किती आवश्यक आहेत व त्यातून जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यास कशी
मदत होते हे विद्यार्थ्यांना व पालकांना समजावून सांगितले आहे.

प्लास्टिकचे दुष्परिणाम पटवून तो आरोग्यासाठी किती घातक असतो याचे सतत त्या मार्गदर्शन करत असतात
तसेच बी रोपं करून रोप तयार करून घेणे,तसेच कोणत्याही कार्यक्रमात रोप भेट देऊन पर्यावरण पूरक सण उत्सव साजरे कराण्याची
मोठी परंपरा त्यांनी परिसरात रुजविली आहे. यासाठी सातत्याने मार्गदर्शन सुरू असते. तालुक्यातील
शाळांमध्ये त्यांना आमंत्रित करुन यासंबंधी मागॅदशॅन करण्याकरीता बोलाविण्यात येत असते. विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या आवर्जून जातात.
स्वतः घरी रोप तयार करून मागणीनुसार रोप भेट देणे, प्रत्येक सण पर्यावरण पूरक साजरा करणे
यामुळे सौ.भांडारकर ह्या राज्य पुरस्काराने सन्मानीत आहेत.
वरील सर्व उपक्रम नवभारत शाळेतील हरित सेनेच्या विद्यार्थांनी राबविलेले आहेत.हे कार्य लक्षात घेऊन शाळेची निवड करण्यात येऊन गणराज्य दिनी सत्कार करण्यात आला आहे.
या हरीतमय सन्मानाकरीता
सौ. भांडारकर मॅडम व नवभारत विद्यालयातील हरीत सेनेचे सवय
स्तरातून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments