Friday, June 12, 2026
Google search engine

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत परी मांदाडेची दमदार कामगिरी; रौप्यपदकावर नाव कोरले

✍️देव पिंपळे मुल प्रतिनिधी✍️

उत्तराखंडमधील देहरादून येथे आयोजित KIO सब-ज्युनिअर, कॅडेट-ज्युनिअर नॅशनल कराटे चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत मूल येथील कराटेपटू परी प्रभाकर मांदाडे हिने उल्लेखनीय कामगिरी करत १२ वर्षांखालील (-५५ किलो) कुमिते प्रकारात रौप्यपदक पटकावून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

देशभरातील विविध राज्यांतील अव्वल खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत परीने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तिने गोवा व पंजाबच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. त्यानंतर बिहारच्या खेळाडूवर विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आणि रौप्यपदक निश्चित केले. अंतिम सामन्यातही तिने चुरशीची लढत देत उपविजेतेपद संपादन केले.

परी ही मूल येथील कराटे अँड फिटनेस क्लबची खेळाडू असून मुख्य प्रशिक्षक इम्रान खान व प्रशिक्षक निलेश गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करते. तिच्या या यशाबद्दल जून्सेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय प्रमुख विनय बोढे, क्लबचे प्रशिक्षक, पालक व क्रीडाप्रेमींनी तिचे अभिनंदन केले आहे.

राष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे मूल शहराची क्रीडा क्षेत्रात मान उंचावली असून भविष्यात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी मोठी कामगिरी करण्याचा निर्धार परीने व्यक्त केला आहे.

Previous article
Next article
RELATED ARTICLES

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments