Friday, June 5, 2026
Google search engine
HomeUncategorized*पाच दिवसीय उन्हाळी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद* पी एम श्री जि. प. शाळा...

*पाच दिवसीय उन्हाळी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद* पी एम श्री जि. प. शाळा राजोली च्या वतीने आयो

                    🖋️देव पिंपळे मूल प्रतिनिधी 🖋️
पी एम श्री जि. प. शाळा राजोली च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय उन्हाळी शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिनांक 2 / 5 /2026 ते 6/ 5 /2026 या कालावधीत पार पडलेल्या या शिबिरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मान. कु. जयश्री गुज्जनवार मँम गटशिक्षणाधिकारी पं. स.मूल तसेच मान. श्री. एकनाथजी पाखमोडे अध्यक्ष शा. व्य. समिती आणि मान. श्री गजाननजी ठिकरे उपसरपंच ग्रा. पं. राजोली तसेच अन्य मान्यवर मंडळींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या शिबिरात विद्यार्थ्यांसाठी योग, चित्रकला, नृत्य, कागदकाम, मातीकाम, विज्ञान आणि तंत्रज्ञान,मूल्यशिक्षण असे विविध क्षेत्रांतील प्रशिक्षण देण्यात आले.
दररोज सकाळी योग व व्यायाम सत्राने दिवसाची सुरुवात होत असे, तर दुसऱ्या सत्रात विविध कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी विविध सत्रात उत्साहाने सहभाग नोंदविला. समारोपाच्या दिवशी मा. श्री. एकनाथजी पाखमोडे अध्यक्ष शा. व्य. समिती, तसेच तज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत
शिबिराच्या समारोप समारंभात विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना अशा शिबिरांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास चालना मिळते, असे मत व्यक्त केले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक श्री.एच.ई.कोकाटे व शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक करून पुढील वर्षीही असे शिबिर आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. अश्विनी वांढरे मँडमने तर आभार प्रदर्शन सौ. मनिषा कोकाटे मँडमने केले. अशाप्रकारे पाच दिवसीय उन्हाळी शिबिराचे आयोजन पार पडले.

RELATED ARTICLES

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments