
✍️: देव पिंपळे मुल प्रतिनिधी✍️ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मूल शहरात अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार-फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.मुल शहरात परिसरात फुलांच्या सजावटीने नटलेला असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या कार्यक्रमात शिवसेना (उ. बा. ठा.) तालुका प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली इतर पदाधिकारी उपस्थित होते. शहर प्रमुख बादल करपे तसेच आकाश कावळे, राकेश मोहुर्ले, चेतन घोनमोडे आणि स्वप्नील नागोशे यांनीही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना
अभिवादन केले.
यावेळी उपस्थितांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करून समाजात समानता, न्याय आणि बंधुता प्रस्थापित करण्याचा संकल्प व्यक्त केला.
ह्या कार्यक्रमात पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.




