
गडचिरोलीत प्रतिनिधी
!!ग्रामसभेचे उपोषण मागे घेण्यात आले!!
!! जि.प.च्या मुख्य कार्यपालन अधिकारी यानी कुरखेडा तालुका पेसा क्षेत्रात असल्याचे पुस्तक छापले.रिजर्व फारेस्ट मध्ये पण बांबु गौण उपज असल्याने ग्रामसभेला कटाई करता येतो.रिजर्व फारेष्ट टिंबर करीता लागु होते.असे असताना वडसा डि.एफ.ओ.रिजर्व फारेष्ट ची सबब पुढे करुन पेसा गावातील ग्रामसभेला बांबु कटाईची मणाई केली!!
!!मा.जिल्हाधिकारी,गडचिरोली, मा.सी.सी.एफ,वन विभाग, गडचिरोली, आम.रामदास जी मसराम, भाजपा जिल्हा महामंत्री श्री प्रकाश गेडाम व ग्रामसभा यांची काहि दिवसापुर्वी सविस्तर बैठक झाली.तेव्हा त्वरीत निर्णय घेउ असे मा.जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचे समोर सी.सी.एफ.गडचिरोली यांनी आश्वासन दिले होते.ते आश्वासन न पाडल्याने ग्रामसभेनी आज पासुन जिल्हाधिकारी,गडचिरोली यांचे कार्यालया पुढे उपोषण सुरू केले.!!
!!भाजपा जिल्हा महामंत्री, श्री प्रकाश गेडाम, भाजपा आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. श्री नितीन जी कोडवते यांच्या नेत्रुत्वात आज अतिरिक्त, जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचेशी चर्चा करण्यात आली. अतिरिक्त जिल्हाधिकारी यानी सी.सी.एफ.ला फोन केला.फोन वर त्वरीत ग्रामसभेला बांबु तोडण्याची परवानगी देणारे पत्र काळुन डी.एफ.ओ.ना पाठवतो असे बोलले.या आश्वासना नंतर उपोषण मागे घेण्यात आले!!
!!यावेळी ग्रामसभेचे अध्यक्ष, सचिव, मोठ्या संख्येने उपस्थित होते!!





