मुल बस स्थानकावर लाट क्रमांक १ वर बस साठी की कर्मचाऱ्यांच्या टू व्हीलर साठी जागा ?
मुल बस स्थानकातील फलाट क्रमांक १ समोर कर्मचाऱ्यांचे टू व्हीलर पार्किंगची अतिक्रमण *
विभाग प्रमुख लक्ष देतील काय ?
मुल चंद्रपूर प्रतिनिधी
महाराष्ट्राचे राज्याचे माजी अर्थमंत्री तथा बल्लारपूर मतदारसंघाचे आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी मूल शहरासाठी अनेक विकासात्मक कामे केली त्याच अनुषंगाने प्रवाशांच्या सोयी करता मूलमध्ये शोभनीय असा बस स्थानक केलाय यात सहा फलाट असून मूलमधून दररोज चंद्रपूर गडचिरोली नागपूर तसेच मुल जवळील खेड्यापाड्यातील प्रवासी प्रवास करीत असतात फलाट क्रमांक एक ते तीन पर्यंत खेड्यापाड्यात राहणाऱ्या बसेस लागत असतात त्यामुळे प्रवासी त्या फलकाच्या समोर आपल्या गावाकडे जाणाऱ्या बस वाट पाहत असतात फलाट क्रमांक एक वर मोरवाही सोमनाथ पेडगाव शिवनी या गावाला जाणाऱ्या बसेस करिता फलाट क्र 1 मध्ये सोय केलेली असताना मात्र या गावाला जाणाऱ्या बसेस दुसऱ्या फलाटावर लागत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे
त्याचे कारणही तसेच आहे फलाट क्रमांक एकवर मूल बस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी आपले टू व्हीलर वाहन फलाट क्रमांक एक वर पार्किंग केल्याने प्रवाशांना आपल्या गावाकडे जाणारी बस कुठे लागली याचा शोध घ्यावा लागतो फलट क्रमांक एक हे बस करिता आहे की बस स्थानकातील कर्मचाऱ्यांच्या वाहनांकरिता आहे हे समजायला मार्ग नाही बस स्थानकाच्या प्रमुखांना मात्र एखाद्या प्रवाशाचे वाहन पार्किंग जवळ दिसले तर त्यांना हटकून त्यांच्यावर कारवाई करतात परंतु आपलेच कर्मचारी हे फलाटाच्या समोर दिवसभर गाडी उभे केलेले त्यांना दिसत नसेल काय? ज्या फलाट क्रमांक समोर च्या गावाकडे जाणाऱ्या गाड्या ची नावे लिहिलेली आहे त्याच फलाट क्रमांक समोर बसेस लावने अनिवार्य आहे परंतु फलाट क्रमांक एक च्या समोर कर्मचाऱ्यांची वाहने लागलेली असल्याने प्रवाशांचे मात्र आपली गाडी कुठे लागली याचा शोध घ्यावा लागतो ज्या फलाट क्रमांक समोर गावांची नावे लिहिलेली आहे त्याच गावाकडे जाणारे बसेस उभी करावी अशी मागणी प्रवासी करीत आहेत तसेच फलट क्रमांक एक समोर कर्मचाऱ्यांची टू व्हीलर पार्किंग काढून मुरवाई शिवनी पेडगाव कडे जाणारे बसेस लावाव्यात अशी मागणी प्रवासी करीत आहेत