Saturday, August 22, 2026
Google search engine

 

साईबाबा मंदिर सभागृहाचे बांधकाम तात्काळ सुरू करावे; अन्यथा भाजपातर्फे आंदोलन

मूल प्रतिनिधि :-                                              मुल नगरपरिषद प्रभाग क्रमांक १ मधील साईबाबा मंदिर परिसरात साईभक्त व स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून साईबाबा मंदिर सभागृहाच्या बांधकामासाठी अंदाजे ₹१ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आले असुनही
सदर कामाची वर्क ऑर्डर होऊन जवळपास आठ महिने लोटुनही, प्रत्यक्ष बांधकामाला अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे साईभक्त व परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण होऊन शोकांतिका वाटते?
साईबाबा मंदिर परिसरात विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात असल्याने सभागृहाची अत्यंत गरज आहे. त्यामुळे संबंधित विभागाने कोणताही विलंब न करता तातडीने बांधकाम सुरू करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.भाजपा शहराध्यक्ष प्रविण मोहुर्ले यांच्या नेतृत्वात भाजपा ज्येष्ठ नेते मोतीलाल टहलियानी, जिल्हा कार्यक्रम प्रमुख डॉ.प्रा. सौ. किरण कापगते, जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष श्री.मिलिंद खोब्रागडे,माजी नगराध्यक्ष उषा शेंडे,नगर सेविका सौ अश्विनी निकोडे,नगर सेविका सौ.प्राची आक्केवार ,महामंत्री प्रशांत बोबाटे,प्रा.सुधीर नागोशे,युवा उपाध्यक्ष सूरज मांदाडे , किसान आघाडी प्रमुख विवेक मांदाडे ,सामाजिक कार्यकर्ता राकेश मोहुर्ले, सामाजिक कार्यकर्ता रुपेश निकोडे,सौ.पूजा रामटेके यांच्या सह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होते.
प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन काम सुरू न केल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल,  असे आवाहन प्रविण मोहुर्ल शहराध्यक्ष यांनी दिला आहे.

 

Previous article
Next article
RELATED ARTICLES

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments