Monday, June 15, 2026
Google search engine

        घनकचऱ्याच्या नादात नगरसेवक भरकटले..?
— शहर तहानलेला,हे गेले “पिकनिक” ला?
रोखठोक.
प्रा.महेश पानसे.
गत 4 दिवसांपासून मूल शहराचा पाणीपुरवठा “सलाईन “वर आहे.अख्खे शहर पाणी पाणी करीत आहे.शहरातील गृहिणी न.प.प्रशासनास शिव्या शाप देत आहेत.
दुदैवाने गत चार पाच दिवसांपासून सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका मॅडम पंढरपूर वारी करीत असल्याची न्यारी बातमी समोर येऊ लागली आहे.पाणी समस्येवर डोकं गरम होण्यापेक्षा शिर्डी,शेगांव,पंढरपूरात नतमस्तक होऊन वाचव रे देवा म्हणण्यातच धन्यता मानणारी या नगरसेवक (खास करून महिला) मंडळींना शहरवासीयांच्या शिवा-शापाशी
काही देणे घेणे नाही का? हा सवाल शहरात उपस्थित होऊ लागला आहे.
नगराध्यक्षा मॅडम स्वता गृहिणी आहेत.वारीवर गेलेल्या अनेक नगरसेविका
गृहिणी आहेत.शहरातील हजारो कुटुंबातील गुहिणींची शुद्ध पाण्याविना काय अवस्था असेल
हे वेगळे सांगायची गरज नसावी असे जाणकार बोलताना दिसतात.
गत काही दिवसांपूर्वी नगराध्यक्षा मॅडम नी शहरात पाणी टंचाई भासू देणार नाही असे पोटतिडकीने सांगितले होते.एकूण
शहरातील अंदाजे 35 हजारावर जनतेला हायसे वाटले होते.नगराध्यक्षानी घोषणा केली तेव्हापासून शहरात पाणी किल्लत अजून जास्त वाढली का?
12 जून पासून तर आजमितीस शहरात पाण्याचा थेंबही नळातून सांडलेला
आठवत नाही.जनचर्चेनुसार
शहरातील 8 ते 9 नगरसेवकांना मात्र याच काळात “पिकनिक “वर जायची आयडिया का सुचली किंवा कुणी
सुचविली हे न.प.अध्यक्षा किंवा उपाध्यक्ष यांनाच ठाऊक असेल.मूल नगरवासीय मात्र पाण्यासोबत या नगरसेवकांची चातकासारखी वाट बघत असल्यास नवल नसावे.
शेगाव,शिर्डी,महाबळेश्वर,पंढरपूर दौरा याबद्दल शहरवासीयांचा आक्षेप नसेल.मात्र नगरसेवक/ नगरसेविकांची पुजाअर्चा फळाला का आली नाही?नळाला पाणी का आले नाही? ही निव्वळ कुणाच्या सौजन्याने घडलेली पिकनिक तर नाही ना?याची गोम घनकचऱ्यात तर दडली
तर नाही ना? असे अनेक सवाल पुढे येऊ लागले
आहेत.
प्रभाग 7 च्या नगरसेवक, सेविकांनी दि.14 ला प़भागात फिरण्याचे व विविध समस्येवर चर्चा करण्याचा व्हाट्सॲप ग़ुपवर शब्द दिला होता.मात्र मंडळी काही पिकनिक वरून परत पोहचलेली नसेल अशीही ईकडे चर्चा सुरू आहे.
गत काही वर्षांपूर्वी मूल शहर पाणी पुरवठा योजनेवर 28 करोड खर्च करण्यात आले.शहराला 24 – 7 दिवस शुद्ध पिण्याचे पाणी
मिळेल अशी दवंडी पिटवल्या गेली.झाले उलट,इकडे गत वर्षभरात अनेकदा शहरवासीयांना पाण्यासाठी बोंबा ठोकाव्या लागत
असल्याचे दुदैवी चित्र बघायला मिळाले आहे.
जनचर्चेनुसार
तहानलेल्या मूल शहराला वाऱ्यावर सोडून ” वारकरी” बनलेल्या मूल न.प.च्या म्होरक्यांची वारी कुणी घडविली.घनकचऱ्यातच खरी गोम दडली तर नाही ना?

(पुढील भागात)

Previous article
RELATED ARTICLES

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments